Special Report | जळगावातला वाद आता ठाणे आणि पुण्यापर्यंत!

| Updated on: Jan 10, 2022 | 9:34 PM

गिरीश महाजन यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोक्का लागण्याच्या भीतीनं कोरोना झाल्याची टीका केली होती. या टीकेपासून वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. एकनाथ खडसे यांनी महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत पाठवण्याचं वक्तव्य केलं होतं. या टीकेला आता गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतायत, अशा शब्दात भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर जोरदार पलटवार केला आहे.

Follow us on

जळगावातील राजकीय वातावरण तापलं आहे. जिल्ह्यातील दोन प्रमुख नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय. गिरीश महाजन यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोक्का लागण्याच्या भीतीनं कोरोना झाल्याची टीका केली होती. या टीकेपासून वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. एकनाथ खडसे यांनी महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत पाठवण्याचं वक्तव्य केलं होतं. या टीकेला आता गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतायत, अशा शब्दात भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर जोरदार पलटवार केला आहे.

गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या टीकेला उत्तर दिलंय. एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळताय, असा पलटवार गिरीश महाजन यांनी केला. खोटेनाटे गुन्हे दाखल करायचे, पोलिसांवर दबाव आणून मोक्काची भीती दाखवण्याचे उद्योग ते करताय, असा आरोपही गिरीश महाजन यांनी केलाय. गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय.