Special Report | Devendra Fadnavis यांच्या गाडीवर चप्पल फेकणारा नेमका कोण? -Tv9

Special Report | Devendra Fadnavis यांच्या गाडीवर चप्पल फेकणारा नेमका कोण? -Tv9

| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 9:52 PM

देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर एका कार्यकर्त्याने चप्पल भिरकावली होती. त्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्याचा शोध सुरू केला आहे.

पुणे : काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर एका कार्यकर्त्याने चप्पल भिरकावली होती. त्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्याचा शोध सुरू केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चप्पल फेकी प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर चिखली पोलिसात दखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. कलम 336 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आलं आहे, त्यामुळे लवकरच त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे. काल पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर होते. त्यासाठी फडणवीसांसह राज्यातले अनेक नेतेही पुण्यात होते. त्यानंतर हा प्रकार घडला होता. पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे.