Special Report | आधी परीक्षा रद्द...मग विद्यार्थ्यांना शुभेच्छा..

Special Report | आधी परीक्षा रद्द…मग विद्यार्थ्यांना शुभेच्छा..

| Edited By: | Updated on: Sep 26, 2021 | 9:57 PM

आरोग्य विभागातील भरती परीक्षा पुढे ढकलल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. यामागे सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे कारण देण्यात आलेले आहे. तशा काही तक्रारीसुद्धा समोर आल्या होत्या.

मुंबई : आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. तसेच पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा होणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, हीच परीक्षा येत्या 15 -16 किंवा 22-23 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. आरोग्य विभागातील भरती परीक्षा पुढे ढकलल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. यामागे सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे कारण देण्यात आलेले आहे. तशा काही तक्रारीसुद्धा समोर आल्या होत्या. काही विद्यार्थ्यांना तर थेट परराज्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेशपत्र मिळालेले नाही. काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर फोटो, केंद्र आणि वेळ देण्यात आलेला नाही. तसेच दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणं शक्य नाही, अशा काही अडचणी समोर आल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.