Special Report | लोकसभेसाठी विखेंची आत्तापासूनच जुळवाजुळव?-tv9
राधाकृष्ण विखे पाटील अजित पवारांना साद घालतायत आणि त्यांचा मुलगा शिवसैनिकांची साथ देतोय. विखे पितापुत्रांच्या या राजकीय भूमिकांमुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपमध्ये खळबळ माजलीय आणि नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. विखे पितापुत्र असं का बोलले असावेत?आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी त्यांनी आत्ताच सुरु केलीय का नगर जिल्ह्यात स्वत:चा गट तयार करण्याचा विखेंचा प्रयत्न […]
राधाकृष्ण विखे पाटील अजित पवारांना साद घालतायत आणि त्यांचा मुलगा शिवसैनिकांची साथ देतोय. विखे पितापुत्रांच्या या राजकीय भूमिकांमुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपमध्ये खळबळ माजलीय आणि नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. विखे पितापुत्र असं का बोलले असावेत?आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी त्यांनी आत्ताच सुरु केलीय का नगर जिल्ह्यात स्वत:चा गट तयार करण्याचा विखेंचा प्रयत्न आहे का? राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्कर श्रोत्री यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत अजित पवारांवरचा प्रश्न आला आणि विखेंनी थेट अजित पवारांनाच भाजपसोबत येण्याची ऑफर दिली. 2019 मध्ये राष्ट्रवादीलाच कंटाळून विखे पाटलांनी काँग्रेस सोडली.. काँग्रेसमध्ये असताना लोकसभेच्या तिकीट वाटपावरुन त्यांचे राष्ट्रवादीसोबत मतभेद झाले. ण तेच विखे आता अजित पवारांना साद घालू लागले आहेत..
