Special Report | यांचे जुने व्हिडीओ Vs त्यांचे जुने व्हिडीओ-tv9

| Updated on: Apr 26, 2022 | 10:02 PM

जसं किरीट सोमय्या आणि संजय राऊतांमध्ये वाक् युद्ध रंगतं. तसं राष्ट्रवदाीचे अमोल मिटकरी आणि भाजपच्या गोपीचंद पडळकरांमध्ये होत आलंय. मात्र सध्या गोपीचंद पडळकर माध्यमांपासून लांब आहेत. आणि पडळकर आणि सदाभाऊ खोतांमध्ये खटके उडतायत. सांगलीतल्या परिसंवाद यात्रेत अमोल मिटकरींनी एसटी संप आणि कडकनाथ कोंबड्यावरुन सदभाऊंना निशाणा केलं.

Follow us on

जसं किरीट सोमय्या आणि संजय राऊतांमध्ये वाक् युद्ध रंगतं. तसं राष्ट्रवदाीचे अमोल मिटकरी आणि भाजपच्या गोपीचंद पडळकरांमध्ये होत आलंय. मात्र सध्या गोपीचंद पडळकर माध्यमांपासून लांब आहेत. आणि पडळकर आणि सदाभाऊ खोतांमध्ये खटके उडतायत. सांगलीतल्या परिसंवाद यात्रेत अमोल मिटकरींनी एसटी संप आणि कडकनाथ कोंबड्यावरुन सदभाऊंना निशाणा केलं. त्यावर सदाभाऊंनी उत्तर दिलंय. इस्लामपूरच्या सभेत अमोल मिटकरींनी राज ठाकरेंसहीत भाजप नेत्यांनाही टार्गेट केलं. काहींची मिमिक्री केली. आणि त्यांची विधानं वादातही सापडली. यानंतर सदाभाऊ खोत फडणवीसांना ‘फडणीस’ का म्हणतात, फडणवीस आणि फडणीस यातलं अंतर एकदा सदाभाऊंनी समजून घेण्याचं आवाहन केलं. त्यावर सदाभाऊ खोतांनी थेट शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या राजकारणावर बोट ठेवलं. नवाब मलिकांची जमीन खरेदी प्रकरणानंतर काही भाजप नेत्यांनी दाऊद इब्राहिम आणि शरद पवारांच्या कथित संबंधावर आरोप केले होते.त्याला उत्तर देण्यासाठी मिटकरींनीइस्लामपुरात जुने व्हिडीओ दाखवले. मात्र आता मिटकरींच्या जुन्या व्हिडीओनंतर सोशल मीडियात व्हायरल व्हिडीओंचा दाखला भाजपकडून दिला जातोय.