Special Report | भुजबळ-सुहास कांदे वादात आता छोटा राजन टोळीची एन्ट्री?

| Updated on: Sep 29, 2021 | 8:54 PM

नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत छगन भुजबळांविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी म्हणून शिवसेना आमदार सुहास कांदे यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे वृत्त आहे. तसा दावा त्यांनी केला आहे. यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, आता या प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) युवा विंगचे प्रदेश अध्यक्ष अक्षय निकाळजे यांनी हे सारे आरोप फेटाळून लावले आहेत.

Follow us on

नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत छगन भुजबळांविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी म्हणून शिवसेना आमदार सुहास कांदे यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे वृत्त आहे. तसा दावा त्यांनी केला आहे. यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, आता या प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) युवा विंगचे प्रदेश अध्यक्ष अक्षय निकाळजे यांनी हे सारे आरोप फेटाळून लावले आहेत. उलट खोट्या आरोपांबद्दल आमदार कांदे यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत छगन भुजबळांविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी म्हणून शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे मंगळवारी म्हटले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे कांदे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना पत्रही दिले होते. या प्रकरणाला बुधवारी एकदम कलाटणी मिळाली आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांचे सारे आरोप फेटाळून लावले आहेत. यावर निकाळजे म्हणाले की, आमदार सुहास कांदे यांचे भाऊ टोलनाका चालवतात. या टोलनाक्यावर आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. त्यासाठी मी सुहास कांदे यांना फोन केला होता. त्यांना फोनवर मी कुठलिही धमकी दिली नाही. छगन भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या, असे म्हणालो नाही. मी कधीही मंत्री छगन भुजबळ यांना भेटलो सुद्धा नाही, असं अक्षय निकाळजे यांनी म्हटलंय.