Special Report | मनपा निवडणुकीच्या तोंडावर नामांतराचं राजकारण-tv9

Special Report | मनपा निवडणुकीच्या तोंडावर नामांतराचं राजकारण-tv9

| Updated on: Aug 06, 2022 | 9:40 PM

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी जेव्हा औरंगाबादमध्ये आले होते तेव्हा इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवली होती. तेच जलील आता कुठलाही मुस्लीम औरंगजेबाला मानत नसल्याचं सांगतायत आणि दुसरीकडे शहराच्या नामांतराला विरोधही करतायत.

औरंगाबादच्या नामांतरावरुन पुन्हा एकदा वादळ उठलंय. राज्य सरकारनं औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं करण्याचा निर्णय घेतलाय. त्याला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केलाय. औरंगाबादचं नामांतर न करता छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं नवं शहर वसवण्याची करण्याची मागणी जलील यांनी केलीय. जलील यांनी असं मत व्यक्त केल्यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली. औरंगजेबाबद्दल एमआयएमला एवढं प्रेम का असा सवाल दानवेंनी केलाय. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी जेव्हा औरंगाबादमध्ये आले होते तेव्हा इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवली होती. तेच जलील आता कुठलाही मुस्लीम औरंगजेबाला मानत नसल्याचं सांगतायत आणि दुसरीकडे शहराच्या नामांतराला विरोधही करतायत.

Published on: Aug 06, 2022 09:40 PM