Special Report | सोशल मीडियातला ‘तो’ व्हिडिओ खरा की खोटा? -Tv9

Special Report | सोशल मीडियातला ‘तो’ व्हिडिओ खरा की खोटा? -Tv9

| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 9:47 PM

रशियाचेही मोठे नुकसान झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात येत आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गुरुवारी पाश्चात्य देशांवर अणुयुद्धाचा विचार असल्याचा आरोप केला.

नवी दिल्ली : गेल्या आठ दिवसांपासून रशियाचे युक्रेनवर सतत जोरदार हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यात युक्रेनमधील अनेक शहरांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक इमारती कोसळल्या आहेत. तर सगळीकडे बेचिराख युक्रेन दिसतंय. कालपासून रशियाने आपले लक्ष युक्रेनमधील इरपिन शहराकडे केंद्रीत केले होते. रशियाने या शहरावर जोरदार मिसाईल हल्ले चढवल्या या शहरांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. बेचिराख झालेलं हे शहर तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता. तर रशियाचेही मोठे नुकसान झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात येत आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गुरुवारी पाश्चात्य देशांवर अणुयुद्धाचा विचार असल्याचा आरोप केला. लॅव्हरोव्ह यांनी रशियन आणि परदेशी माध्यमांना दिलेल्या ऑनलाइन मुलाखतीत सांगितले की, हे स्पष्ट आहे की तिसरे महायुद्ध केवळ अण्वस्त्र युद्ध असू शकते. मी हे निदर्शनास आणू इच्छितो की अणुयुद्धाची कल्पना रशियन लोकांच्या डोक्यात नसून पाश्चात्य देशांच्या नेत्यांच्या मनात सतत आहे.

Published on: Mar 03, 2022 09:46 PM