Special Report | Ukraine सरेंडक करणार…की Vladimir Putin गेम ओव्हर करणार? -tv9

| Updated on: Feb 25, 2022 | 9:22 PM

यूक्रेनने आपली शस्त्रे टाकल्यानंतरच त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असं रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन  यांनी स्पष्ट केलंय. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी शुक्रवारी सांगितलं की मॉस्को यूक्रेनसोबत चर्चेसाठी तेव्हाच तयार होईल.

Follow us on

मुंबई : रशियाकडून (Russia) यूक्रेनवर सातत्याने हल्ले सुरुच आहेत. दुसरीकडे रशियाकडून यूक्रेनवर (Ukraine) मोठा दबाव टाकला जात आहे. यूक्रेनमधील शहरं आणि सैन्य तळांवर हवाई हल्ले केल्यानंतर आणि यूक्रेनच्या तिनही बाजुंनी सैन्य आणि टँक पाठवल्यानंतर आता रशियन सैन्य यूक्रेनची राजधानी कीव शहरापर्यंत पोहोचलं आहे. या पार्श्वभूमीवर यूक्रेनने आपली शस्त्रे टाकल्यानंतरच त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असं रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन  यांनी स्पष्ट केलंय. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी शुक्रवारी सांगितलं की मॉस्को यूक्रेनसोबत चर्चेसाठी तेव्हाच तयार होईल, जेव्हा यूक्रेनचं सैन्य आपली शस्त्रास्त्रे टाकेल. त्याचबरोबर यूक्रेनवर नियो-नाझी यांचं राज्य असावं असं मॉस्कोला वाटत नसल्याचंही लावरोव यांनी म्हटलंय, यूक्रेनवर दुसऱ्या दिवशीही रशियन सैन्यांचे हल्ले सुरु आहेत. राजधानी कीवमध्येही आता बॉम्ब हल्ल्याचे आवाज ऐकायला मिळत आहेत. शुक्रवारी पहाटे कीवमध्ये हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजताच, शहरातील एका हॉटेलमधील उपस्थित पाहुण्यांना खंदकांमध्ये जाण्यास सांगण्यात आलं. कर्मचारी, तसंच स्थानिक विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना चहा आणि खाण्याचे पदार्थ देऊ केले.