Special Report : शिवजयंतीवरुन अमेय खोपकर आणि अमोल मिटकरींमध्ये शाब्दिक चकमक!

| Updated on: Mar 21, 2022 | 9:47 PM

मिटकरी यांनी शिवजयंती तारखेनुसार साजरी व्हावी, असं म्हटलंय. “तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण आहे”, असंही मिटकरी म्हणालेत. त्यावरूनच आता मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मिटकरींना सुनावलं आहे.

Follow us on

तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जातेय. सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह आहे. अश्यात आता राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी विरूद्ध शिवसेना-मनसे असा वाद निर्माण झालाय. मिटकरी यांनी शिवजयंती तारखेनुसार साजरी व्हावी, असं म्हटलंय. “तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण आहे”, असंही मिटकरी म्हणालेत. त्यावरूनच आता मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मिटकरींना सुनावलं आहे.

“मिटकरी फालतू राजकारण करू नका. तुम्हाला नेहमीच फालतू राजकारण करायची सवय आहे. प्रसिद्धीसाठी काहीही बडबड करता. अक्कल आहे का तुम्हाला? कुठल्या गोष्टीचे राजकारण करता, याची लाज वाटली पाहिजे तुम्हाला.” असे अमेय खोपकर यांनी म्हंटले. यावरून परत, “तुमची अक्कल किती आहे, हे मला माहिती आहे” असा पलटवार मिटकरी यांनी केला. तसेच, शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणून दाखवा, असे आवाहनही दिले. त्यावर, तुमच्या सांगण्यावरुन मी का म्हणू? अशा शब्दात खोपकर यांनी मिटकरींना प्रत्युत्तर दिलंय.

मिटकरी यांनी विनायक राऊतांनीही सुनावलं आहे. “अमोल मिटकरी यांना विनंती आहे की तुम्ही गोंधळ निर्माण करू नका. शासनाने जन्मतारीख शोधून काढली त्यानुसार शासन शिवजयंती साजरी करेल. पण शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी, अशी शिवप्रेमींची भावना आहे. त्याप्रमाणे ते साजरे करत आहेत. तुम्ही संभ्रम निर्माण करू नका”, असं खासदार विनायक राऊत म्हणालेत.