ZP Polls in Two Phases : राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका 2 टप्प्यात? निवडणूक आयोगाच्या हालचाली नेमक्या काय?
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका आता दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. 32 पैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्यामुळे हा निर्णय घेतला जात आहे. 21 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टात यासंदर्भात सुनावणी होणार असून, त्यानंतर 17 जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेण्याबाबत आयोग विचार करेल
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका आता दोन टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे काही ठिकाणी 50% आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे. एकूण 32 जिल्हा परिषदांपैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये ही मर्यादा ओलांडली गेली आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात 21 जानेवारी रोजी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे. राज्य निवडणूक आयोगाची तयारी पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याची आहे, तर उर्वरित 17 जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोर्टाच्या निर्देशानुसार दुसऱ्या टप्प्यात घेण्याबाबत आयोग निर्णय घेऊ शकतो. जिल्हा परिषद निवडणुकांसोबतच नगरपालिका, नगरपंचायतीनंतर आता महापालिका निवडणुका घेण्याबाबतही राज्य निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू आहेत.
