Nana Patole | केंद्रात OBC मंत्रालय व्हावं म्हणून मी खासदार झालो मात्र…

| Updated on: Apr 17, 2022 | 10:06 PM

राजकीय आरक्षणाचा जेव्हा सुरू झालं मग आपल्या राज्यात कित्येक वर्षे ओबीसी आयोगाच नव्हतं. या सरकारने आयोग निर्माण केला मात्र त्यात काय घडलं सांगण्याची गरज नाही. सरकार कोणताही असेल तर आपण समाजासाठी लढलो तर कोणीही काही बिघडवू शकत नाही. आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

Follow us on

YouTube video player

नागपूर : ग्रामीण भागातील ओबीसी जनतेला आरक्षणबद्दल नेमकं काय सुरू आहे हे कळावं म्हणून कार्यक्रम ग्रामीण भागातील एका शेतात घेण्यात आला. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी सांगितलं. देशात सगळ्यात जास्त संख्या ओबीसींची आहे, माझ्या सारख्या नेता घडविण्याची क्षमता ओबीसीमध्ये आहे. इतर समाजाच मंत्रालय आहे त्याप्रमाणे केंद्रात ओबीसी मंत्रालय व्हावं म्हणून मी खासदार झालो मात्र ते पूर्ण झालं नाही म्हणून मी खासदारकी सोडली. विधानसभा अध्यक्ष असताना मी पहिल्यांदा ठराव आणला आणि पास करून केंद्राकडे पाठविलं होता. नेते कोणत्याही पक्षाची असू शकतात मात्र समाजासाठी काम आवश्यक आहे. राजकीय आरक्षणाचा जेव्हा सुरू झालं मग आपल्या राज्यात कित्येक वर्षे ओबीसी आयोगाच नव्हतं. या सरकारने आयोग निर्माण केला मात्र त्यात काय घडलं सांगण्याची गरज नाही. सरकार कोणताही असेल तर आपण समाजासाठी लढलो तर कोणीही काही बिघडवू शकत नाही. आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.