Vidhan Bhavan Rada : मोठी बातमी, विधीमंडळातल्या राड्यानंतर कठोर नियमावली, ‘या’ व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री

Vidhan Bhavan Rada : मोठी बातमी, विधीमंडळातल्या राड्यानंतर कठोर नियमावली, ‘या’ व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री

| Updated on: Jul 18, 2025 | 12:11 PM

काल विधानभवनाच्या लॉबीमध्येच जोरदार राडा झाला, एकमेकांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. तर आज विधीमंडळातल्या राड्यानंतर विधनाभवनात कठोर नियमावली असणार आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात विधीमंडळातल्या राड्यानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. विधीमंडळात झालेल्या या हाणामारीनंतर विधानभवनात कठोर नियमावली जारी करण्यात आली आहे. ही नियमावली सुरक्षेसंदर्भात असल्याचे सांगितले जात आहे. अभ्यागतांसाठी आज विधानभवनात प्रवेश नाकारण्यात आला आहे. विधानभवनात येण्यासाठी ज्यांच्याकडे पिवळ्या रंगाचा पास असेल त्यांना विधानभवनात मज्जाव असणार आहे. तर आज केवळ सरकारी अधिकाऱ्यांनाच विधानभवनात प्रवेश असणार आहे. तर इतर व्यक्तींना विशेष परवानगीचं पत्र घेऊनच प्रवेश देण्यात येणार आहे.

काल विधानभवनाच्या लॉबीमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं, जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आपसात भिडले. लॉबीमध्येच या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

Published on: Jul 18, 2025 10:08 AM