SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 01 October 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 01 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 9:06 AM

जळगाव जिल्ह्यात 3500 हेक्टर केळीचं नुकसान झालं आहे. अनेक घरं आणि शेतजमिनीचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यासाठी पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येकाचा पिकपेरा वेगळा असल्याने सरसकट मदत करता येणार नाही. पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करूनच शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. सरसकट पंचनामे करण्यात येत आहेत.

मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि प्रत्येकाला प्रत्येकी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज यांच्या या मागणीवर टीका केली आहे. राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे मोठं काम केलं नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

गुलाबराव पाटील आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य. पण त्यांनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. राजकारण करू नका, असं पाटील म्हणाले. मागणी करणं सोपं आहे. पण निर्णय पंचनाम्यानंतरच घेतला जाईल. प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती पाहून ओला दुष्काळ जाहीर केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

Published on: Oct 01, 2021 09:06 AM