100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 3 February 2022 -TV9

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 3 February 2022 -TV9

| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 9:30 AM

एसटी विलीनीकरणाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे. कोर्ट विलीनीकरणाच्या मुद्द्यावर काय निर्णय देतं याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 3 February 2022 -TV9

1) राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळेतच होणार आहेत. या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याची माहिती मिळतेय.

2) एसटी विलीनीकरणाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे. कोर्ट विलीनीकरणाच्या मुद्द्यावर काय निर्णय देतं याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

3) एसटी महामंडळाने बुधवारी 189 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. तर आतापर्यंत अकरा हजार 24 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

4) आज मुंबई पालिका अर्थसंकल्प सादर करणार आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे काही नव्या योजना, संकल्प सादर केले जाण्याची शक्यता आहे