SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 22 October 2021

| Updated on: Oct 22, 2021 | 8:30 AM

जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख कळंब तालुक्यातील बाहुला गावातील बंधाऱ्यांची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचे सांगण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते त्यांच्याकडे आले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोयाबीनचे किती नुकसान झाले हे दाखवण्यासाठी खराब झालेले सोयाबीन सोबत आणले होते. मात्र, हे सोयाबीन गडाख यांनी पाहिले नाही.

Follow us on

जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा उस्मानाबाद दौरा चांगलाच वादळी ठरला. त्यांच्या दौऱ्यादरम्यान उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. तसेच ‘तू जास्त बोलू नको’ असे म्हणत शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलाच दम दिला. या पूर्ण वादाचा व्हिडीओ समोर आला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख कळंब तालुक्यातील बाहुला गावातील बंधाऱ्यांची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचे सांगण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते त्यांच्याकडे आले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोयाबीनचे किती नुकसान झाले हे दाखवण्यासाठी खराब झालेले सोयाबीन सोबत आणले होते. मात्र, हे सोयाबीन गडाख यांनी पाहिले नाही. याच कारणामुळे भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर भाजप तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. ‘तू जास्त बोलू नको’ असे म्हणत शिवसेनेच्या खासदाराने भाजपच्या कार्यकर्त्यांना दम दिला.