VIDEO : 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 7 August 2021

| Updated on: Aug 07, 2021 | 5:50 PM

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, मनसे, भाजप आणि राष्ट्रवादीने निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही कंबर कसली आहे. त्यामुळेच शिवसेनेने युवा नेत्यांना पुढे आणण्याच्या हालचाली सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.

Follow us on

पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत असल्याने शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्याचं आणि वरुण सरदेसाई यांच्यावर युवा सेनेचा भार देण्याचं शिवसेनेत घडत आहे. तर तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे. त्यामुळे शिवसेना नव्या दमाच्या नेतृत्वाला सोबत घेऊन महापालिका सर करण्यासाठी डावपेच आखत असल्याचं स्पष्ट होत आहे.  मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, मनसे, भाजप आणि राष्ट्रवादीने निवडणुकीची तयारी सुरू आहे.