Anil Deshmukh Update | अनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
सुप्रीम कोर्टाचा अनिल देशमुख यांना दणका

Anil Deshmukh Update | अनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

| Updated on: Apr 08, 2021 | 7:29 PM

सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे.

मुंबई: परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. यासोबत न्यायालयाने महाविकासआघाडी सरकारने केलेली याचिकाही फेटाळून लावली आहे. याप्रकरणात आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ घातलेली आपली चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. मात्र, याप्रकरणात सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला. त्यामुळे आता अनिल देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतत उरलेले नाही. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाविकासआघाडी सरकारसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.

Published on: Apr 08, 2021 06:11 PM