पोटगी म्हणून महिलेने मागितलं असं काही की.., सरन्यायाधीश गवईही हादरले!
सर्वोच्च न्यायालयात एका हाय-प्रोफाइल घटस्फोट प्रकरणातील पोटगीच्या मागणीवर सुनावणी सुरू आहे. यावेळी महिलेने मागितलेली पोटगीची रक्कम ऐकून सरन्यायाधीशही चकित झाले.
सर्वोच्च न्यायालयात एका हाय-प्रोफाइल घटस्फोट प्रकरणातील पोटगीच्या मागणीवर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात पीडित महिलेच्या वकिलांनी तिच्यासाठी 18 कोटी रुपये, मुंबईत घर आणि BMW कारची मागणी केली आहे. या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरली आहे.
सरन्यायाधीश गवई यांनी आश्चर्य व्यक्त करत म्हटले, “लग्न केवळ 18 महिने टिकले आणि तुम्ही प्रत्येक महिन्यासाठी एक कोटी रुपये मागत आहात, शिवाय BMW कारही हवी आहे.” त्यांनी पुढे सांगितले, “तुम्ही उच्चशिक्षित आहात, बंगलुरू किंवा हैदराबादसारख्या शहरांमध्ये सहज नोकरी मिळवू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतः कमवून स्वावलंबी व्हायला हवे, अशी मागणी करू नये.”
गवई यांनी टिप्पणी केली की, ज्या फ्लॅटमध्ये महिला राहते, त्याला मुंबईसारख्या शहरात दोन पार्किंग जागांचा लाभ आहे, ज्याचा योग्य वापर करता येईल. दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकून सुप्रीम कोर्टाने आपला निकाल राखीव ठेवला आहे. या हाय-प्रोफाइल प्रकरणात न्यायालय काय निर्णय देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
