Waqf Board : वक्फ कायद्याबाबत मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती अन्… कोर्टात काय घडलं?
सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी वक्फ सुधारणा कायदा, 2025 वर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायालयाने आदेश दिला की नव्या वक्फ कायदा पुढील सुनावणीपर्यंत जैसे थे.. तसेच या कालावधीत कोणत्याही वक्फ बोर्डावर नवीन नियुक्त्या करू नयेत, असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत.
नव्या वक्फ कायद्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाकडून तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने जैसे थेच परिस्थिती ठेवावी असं म्हणत सुप्रीम कोर्टाकडून नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती दिली आहे. दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयकावर सत्तर पेक्षा अधिक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यातील महत्त्वाच्या पाच याचिकांवर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. यापैकी नव्या वक्फ कायद्यातील दोन कलमांना सुप्रीम कोर्टाकडून तुर्तास स्थिगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर याबाबत केंद्र सरकारला उत्तर देण्यास सात दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. यासह यासंदर्भात बोलतना सुप्रीम कोर्टाच्या वकिलांकडून एक मोठी माहिती देण्यात आली आहे. वक्फ कायद्याबाबत पुढील सुनावणी ही येत्या ५ मे रोजी होणार असल्याचे वकिलांनी सांगितलंय.
