सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी

सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी

| Updated on: Nov 16, 2025 | 5:05 PM

सुप्रिया सुळे यांनी नवले पूल अपघातस्थळाची पाहणी केली. तीन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय, प्रफुल्ल पटेल यांचे बाहुबली राजकारणावरचे वक्तव्य, सुप्रिया सुळे यांचा संविधानाचा उल्लेख, गुलाबराव पाटील यांचे महायुतीवरील भाष्य आणि अमित ठाकरे यांच्या हस्ते नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन या घडामोडी चर्चेत आहेत.

सुप्रिया सुळे यांनी आज नवले पूल अपघातस्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तीन दिवसांपूर्वी या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांना जीव गमवावा लागला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. अपघातांची सातत्याने वाढती संख्या लक्षात घेता, या पुलाच्या उंची वाढवण्याबाबत मुरलीधर मोहोळ यांनी यापूर्वीच वक्तव्य केले आहे. सुप्रिया सुळे यांच्या पाहणीमुळे या गंभीर समस्येकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.

दरम्यान, राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पैशाच्या आधारावर कुणी निवडून येत नाही असे वक्तव्य करत बाहुबली नेत्यांना इशारा दिला. यावर सुप्रिया सुळे यांनी संविधानाची खिल्ली उडवणारे हे वक्तव्य असल्याची टीका केली. गुलाबराव पाटील यांनी महायुती सन्मानाने होत असेल तर अडचण नसल्याचे, अन्यथा ताकदीवर लढण्यास तयार असल्याचे म्हटले. नेरूळमध्ये अमित ठाकरे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. सरकारला अनावरणासाठी वेळ न मिळाल्याने हा पुतळा चार महिने धूळ खात होता, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Published on: Nov 16, 2025 05:05 PM