Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्षण…
लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं होतं, नुकतीच सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकाबाबत स्पष्ट मत मांडलं. इतकेच नाही, तर सत्ताधारी पक्षाला थेट एक प्रश्न विचारला.
लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं होतं, ते विधेयक नामंजूर झालं. हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र याच मुद्द्यावरून राजकारण पेटलं आहे. नुकतीच सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकाबाबत स्पष्ट मत मांडलं. इतकेच नाही, तर सत्ताधारी पक्षाला थेट एक प्रश्न विचारला.
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “2023 मध्ये नारीशक्ती विधेयक पास झालं होतं. 2024 च्या लोकसभेत आरक्षण लागू होण्याची शक्यता होती. मग अडीच वर्ष झाली तरी विधेयकाची अंमलबजावणी का केली नाही? आता विशेष अधिवेशन बोलावलं, यातून तुम्हाला काय मिळालं?”, असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, “विषय नसताना विषय बनवत आहेत. विधेयक पडणार हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही माहीत होतं. आम्हाला भाजपच्या दुटप्पीपणाची सवय झाली आहे. 50 टक्के जागा प्रत्येक राज्यात वाढवणार, हे विधेयकात का नाही?”, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
