Suraj Chavhan : तुझा बंदोबस्त सांगून करू; सुरज चव्हाण यांचं लक्ष्मण हाकेंबद्दल मोठं विधान

Suraj Chavhan : तुझा बंदोबस्त सांगून करू; सुरज चव्हाण यांचं लक्ष्मण हाकेंबद्दल मोठं विधान

| Updated on: Jun 01, 2025 | 5:09 PM

Suraj Chavhan Slams Laxman Hake : राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांनी ट्विट करत लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे.

लक्ष्मण हाके धनगर आणि ओबीसी समाजाला लागलेला कलंक आहे असं सुरज चव्हाण म्हणाले आहेत. समाजाच्या नावावर स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा डाव आहे, असंही चव्हाण यांनी म्हंटलं आहे. राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांनी हे ट्विट करत हाके यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये सूरज चव्हाण यांनी म्हंटलं आहे की, लक्ष्मण हाके हा आपला दर्जा.. तू म्हणजे धनगर समाज नसून आमच्या धनगर आणि ओबीसी समाजाला लागलेला कलंक आहे. समाजाच्या नावावर स्वत:ची राजकीय पोळी भाजूनघेण्याचा तुझा डाव आहे. पवार कुटुंबावर बोलून काहींना आमदारकी मिळवली. तुलाही तशीच स्वप्न पडतात. परंतु तुझी गाठ आमच्याशी आहे. ही नवी राष्ट्रवादी आहे. घड्याळ तेच वेळ नवी. त्यामुळे तुझा बंदोबस्त सांगून करू, असंही या ट्विट मध्ये चव्हाण यांनी लिहिलं आहे.

Published on: Jun 01, 2025 05:07 PM