Sushil Kedia : माझं चुकलं, मला..; मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुशील केडियाचा यू टर्न

Sushil Kedia : माझं चुकलं, मला..; मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुशील केडियाचा यू टर्न

| Updated on: Jul 05, 2025 | 2:21 PM

Sushil Kedia controvercial statement : प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि ‘केडियोनॉमिक्स’ या ट्रेडिंग फर्मचा संस्थापक सुशील केडिया आता आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर यूटर्न घेतला आहे.

माझ्या चुकीबद्दल मी माफी मागतो, असं व्यावसायिक सुशील केडियाने म्हंटलं आहे. मला माफ करा, मी माझे वक्तव्य मागे घेतो, असंही केडियाने म्हंटलं आहे. बिघडलेलं वातावरण चांगलं करा असंही केडियाने लिहिलं आहे. मराठी भाषेबद्दल सुशील केडियाने काल वादग्रस्त विधान केलं होतं. 30 वर्ष इथे आहे, मराठी माहिती नाही, बोलता येत नाही, मराठी बोलणार नाही, असंही केडियाने म्हंटलं होतं. त्यानंतर आज केडियाने आपल्या याच वक्तव्यावरून घुम जाओ केलेलं असून माफी देखील मागितली आहे.

शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि ‘केडियोनॉमिक्स’ या ट्रेडिंग फर्मचा संस्थापक सुशील केडिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठीच्या मुद्द्यावरून चॅलेंज केले होते. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर केडिया यांनी आपल्याच वक्तव्यावरून यू टर्न घेतलेला दिसून आला आहे.

Published on: Jul 05, 2025 02:21 PM