Sushma Andhare : आवरा जरा माणसं… फलटण डॉक्टर प्रकरणी चाकणकरांचा अंधारेंकडून समाचार अन् सडकून टीकास्त्र

Sushma Andhare : आवरा जरा माणसं… फलटण डॉक्टर प्रकरणी चाकणकरांचा अंधारेंकडून समाचार अन् सडकून टीकास्त्र

| Updated on: Oct 29, 2025 | 11:30 AM

फलटणमधील मृत डॉक्टर तरुणीच्या प्रकरणावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केले आहेत. मृत महिलेचे चारित्र्य हनन केल्याचा, तपास पूर्ण होण्यापूर्वीच तिची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केल्याचा आणि कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका अंधारेंनी ठेवला आहे. महिला आयोगाला कलंक लावल्याचेही त्या म्हणाल्या.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पत्रकार परिषदेवर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. फलटणमधील एका मृत डॉक्टर तरुणीच्या प्रकरणाच्या हाताळणीवरून त्यांनी हे गंभीर आरोप केले. मृत महिलेचे चारित्र्य हनन का केले गेले आणि चाकणकर कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सवाल अंधारेंनी उपस्थित केले. तपास पूर्ण होण्यापूर्वीच मृत महिलेची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केल्याबद्दल त्यांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि रुपाली चाकणकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

एखादी महिला दोन व्यक्तींशी बोलल्यामुळे तिला मारण्याचा किंवा तिचा छळ करण्याचा अधिकार कोणाला मिळतो, असा प्रश्न अंधारेंनी विचारला. त्यांनी सुनील तटकरे यांना माणसे आवरा असे सांगत, चुकीच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी बसवून महिला आयोगाला काळीमा फासू नये अशी मागणी केली. या प्रकरणातील भाजपचे माजी खासदार रणजीत निंबाळकर यांच्यावरील आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिल्यानेही टीकेची झोड उठली आहे. अंधारेंनी महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Published on: Oct 29, 2025 11:30 AM