Breaking | MPSC च्या 2996 पदांसाठी मुलाखती रखडल्या, स्वप्नीलच्या आत्महत्येमुळे प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Breaking | MPSC च्या 2996 पदांसाठी मुलाखती रखडल्या, स्वप्नीलच्या आत्महत्येमुळे प्रश्न पुन्हा ऐरणीवर

| Updated on: Jul 05, 2021 | 8:42 AM

MPSC Exam | MPSC च्या 2996 पदांसाठीमुलाखती रखडल्या, स्वप्नीलच्या आत्महत्येमुळे प्रश्न पुन्हा ऐरणीवर. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

MPSC च्या 2996 पदांसाठीमुलाखती रखडल्या, स्वप्नीलच्या आत्महत्येमुळे प्रश्न पुन्हा ऐरणीवर. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

पासआऊट होऊन दोन वर्ष झाली आहेत. 24 वय संपत आलं आहे. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेले कर्ज, खासगी नोकरी करुन कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना. नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस मनात होती. पण काही तरी चांगलं होईल या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे काहीच उरलेलं नाही. यास कोणत्याही व्यक्ती कारणीभूत नसून हा सर्वस्वी माझा निर्णय आहे, असे स्वप्नीलने सुसाईड नोटमध्ये म्हटले होते.