Tara Bhawalkar : कमी वयात विद्यार्थ्यांवर 3 भाषा लादू नका – तारा भवाळकर

Tara Bhawalkar : कमी वयात विद्यार्थ्यांवर 3 भाषा लादू नका – तारा भवाळकर

| Updated on: Jun 25, 2025 | 4:17 PM

ज्येष्ठ साहित्यिका आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी देखील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोटीका केली आहे.

विद्यार्थ्यांवर कमी वयात 3 भाषा लादू नका असं तारा भवाळकर यांनी म्हंटलं आहे. विद्यार्थ्यांना चौथीपर्यंत मातृभाषा शिकवण्यात यावी, असंही त्यांनी म्हंटलं आहे.

यावेळी पुढे बोलताना तारा भवाळकर म्हणाल्या की, सरकारने मोठ्या चतुरपणाने त्रीभाषिक अशी भाषा वापरली आहे, त्यांनी हिंदी भाषा सक्तीची असे कुठेही म्हटले नाही. त्रीभाषा सूत्र असे म्हणत मेक मारली आहे, असा आरोप अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केला आहे. तुम्हीच 3 री भाषा निवडा असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोठ्या चतुरपणाने म्हंटले आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या. लहान कोवळ्या मुलांवर अन्याय करू नका,  चौथीपर्यंत मातृभाषा शिकवावी आणि त्यानंतर अन्य भाषेबाबत विचार करावा. माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही, मात्र हिंदीची शक्ती करू नये, असं मत ज्येष्ठ साहित्यिका आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केलं आहे.

Published on: Jun 25, 2025 04:17 PM