टाटा ACE Pro चे पुण्यात दमदार पदार्पण
टाटा ऐस प्रोचे पुण्यात दमदार पदार्पण झाले आहे. नव्या पिढीला समोर ठेवून हे वाहन तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे या वाहनाविषयीचं कुतुहूल वाढलं आहे.
टाटा ACE Pro चे पुण्यात दमदार पदार्पण झाले, ही घटना व्यावसायिक मालक, फ्लीट ऑपरेटर आणि टाटा मोटर्सच्या नेतृत्व संघातील सदस्यांना एकत्र आणणारी ठरली. या ठिकाणी नाविन्य, उद्योगशीलता आणि उद्दिष्ट यांचा संगम अनुभवायला मिळाला. उपस्थितांनी नवीन टाटा Ace Pro चे थेट प्रात्यक्षिके आणि चाचणी ड्राइव्हद्वारे अनुभव घेतला, तर इनोव्हेटिव्ह झोनमध्ये या वाहनाच्या उत्कृष्ट अभियांत्रिकी आणि कामगिरीची झलक मिळाली.
एससीव्ही आणि पिकअपचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख पिनाकी हलदार तसेच व्यावसायिक वाहने उपाध्यक्ष आणि प्रमुख अभियंता अनिरुद्ध कुलकर्णी यांनी उपस्थितांना उद्दिष्ट, विचारसरणी आणि दररोज भारताची प्रगती साधणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या नेक्स्ट जनरेशन व्हेईकल तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले.
Published on: Jun 27, 2025 04:03 PM