इर्शाळवाडी ग्रामस्थांचं तात्पुरतं पुनर्वसन! प्रशासनानं मागवले 30 कंटेनर यार्ड!
इर्शाळवाडी ग्रामस्थांच्या तात्पुरत्या निवारासाठी कंटरनेरची सोय करण्यात आली आहे. प्रशासनामार्फत 30 कंटनेर यार्डची सोय करण्यात आली आहे. वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा देखील उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
रायगड, 21 जुलै 2023 | इर्शाळवाडीत दरड कोसळल्यामुळे आख्खं गावच मलब्याखाली आलं. या दुर्घटनेमुळे इर्शाळवाडीकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 21 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. मात्र ही घरं उपलब्ध होईपर्यंत इर्शाळवाडी ग्रामस्थांच्या तात्पुरत्या निवारासाठी कंटरनेरची सोय करण्यात आली आहे. प्रशासनामार्फत 30 कंटनेर यार्डची सोय करण्यात आली आहे. वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा देखील उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Published on: Jul 21, 2023 08:58 AM
