TET Scam | टीईटी घोटाळ्यात GA कंपनीचा संचालक सौरभ तिवारीला अटक

TET Scam | टीईटी घोटाळ्यात GA कंपनीचा संचालक सौरभ तिवारीला अटक

| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 11:35 AM

पुणे सायबर पोलिसांकडून टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील लखनऊ मधून एकाला अटक करण्यात आली आहे. सौरभ त्रिपाठी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

टीईटी परीक्षेतील घोटाळ्याची (TET Exam Scam) व्याप्ती वाढत असल्याचं दिसून येत आहे. बंगळुरुमधून आश्विन कुमार (Ashwin Kumar) याला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Cyber Police) मोर्चा उत्तरेकडे वळवला आहे. उत्तर प्रदेशातून पुणे पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांकडून टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील लखनऊ मधून एकाला अटक करण्यात आली आहे. सौरभ त्रिपाठी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पुणे सायबर पोलीस सौरभ त्रिपाठीला पुण्यात आणणार आहेत. पुण्यात आणून पुणे पोलीस सौरभ त्रिपाठीची चौकशी करण्यात येणार आहे. सौरभ त्रिपाठी हा जीए टेक्नॉलॉजी कंपनीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.

Published on: Dec 22, 2021 11:13 AM