Thackeray Brothers Alliance : मन गहिवरलं, डोळे पाणावले…दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र बघून मनसैनिकांना अश्रू अनावर

Thackeray Brothers Alliance : मन गहिवरलं, डोळे पाणावले…दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र बघून मनसैनिकांना अश्रू अनावर

| Updated on: Dec 24, 2025 | 1:59 PM

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची पत्रकार परिषद मुंबईत पार पडत असताना नाशिकमधील मनसे कार्यालयात शिवसैनिक व मनसैनिक एकत्र आले. अनेक वर्षांपासूनची त्यांची इच्छा पूर्ण झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले असून, ही युती महाराष्ट्रातील बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा देईल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची मुंबईत पार पडलेली पत्रकार परिषद नाशिकमधील मनसे कार्यालयात उत्साहात पाहिली गेली. मनसे आणि ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते एकत्रितपणे हा ऐतिहासिक क्षण अनुभवत होते. अनेक वर्षांपासून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी शिवसैनिक आणि मनसैनिक यांची इच्छा होती, जी आज पूर्ण झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे आणि आज ती इच्छा पूर्ण झाली आहे. त्यांनी या दोघांना राम-लक्ष्मण जोडी संबोधत, त्यांची युती भारतीय जनता पार्टी, दाढीवाला रिक्षावाला आणि अजित दादा यांच्यासह इतरांना आव्हान देईल आणि मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिकांवर भगवा फडकवेल असा विश्वास व्यक्त केला. ही युती बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधात असल्याचेही काही कार्यकर्त्यांनी म्हटले. या ऐतिहासिक क्षणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असून, ठाकरे ब्रँडच महाराष्ट्रावर राज्य करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Published on: Dec 24, 2025 01:59 PM