Thackeray Brothers Alliance : मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?

| Updated on: Dec 17, 2025 | 11:16 AM

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. संजय राऊत आणि अनिल परब यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर जागा वाटपावर बैठका सुरू झाल्या आहेत. मनसेने ८० जागांची मागणी केली असून, उद्धव ठाकरेंची शिवसेना १३०-१३५ जागा लढवू शकते. काँग्रेस स्वतंत्र लढण्यावर ठाम असून, शिवाजी पार्कसाठीही रस्सीखेच सुरू आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. नुकतीच संजय राऊत आणि अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीनंतर लवकरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीची घोषणा होईल, असे संकेत मिळाले आहेत. येत्या आठवड्यात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत. मनसेने मुंबईतील २२७ जागांपैकी ८० जागांची मागणी केली आहे, ज्यात ५० ‘ए-प्लस’ जागांचा समावेश आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना १३० ते १३५ जागा लढवण्याची शक्यता आहे. यासोबतच उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेण्यास इच्छुक असले, तरी काँग्रेसने स्वतंत्र लढण्यावर ठाम भूमिका घेतली आहे. शिवाजी पार्कवरील सभेसाठीही तिन्ही शिवसेना गटांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

Published on: Dec 17, 2025 11:16 AM