Thackery Brothers : ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार, निशाण्यावर कोण? आधी राज नंतर उद्धव ठाकरेंचं भाषण; मुद्दा फक्त मराठीचा..

Thackery Brothers : ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार, निशाण्यावर कोण? आधी राज नंतर उद्धव ठाकरेंचं भाषण; मुद्दा फक्त मराठीचा..

| Updated on: Jul 05, 2025 | 8:07 AM

मराठीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. तर दुसरीकडे आज ठाकरे बंधूंच्या मेळाव्याकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या राजकीय वर्तुळाच्याही नजरा लागल्यात. विषय मराठीचा असला तरी भविष्यातील राजकीय युती म्हणून याकडे पाहिलं जात आहे.

आज राज ठाकरेंचं पहिलं भाषण होणार आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाषण होईल. ठाकरे बंधूंचा मेळावा आता काही तासांवर आलाय. वरळी मधल्या सभागृहात तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे. मंचावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे ठाकरे बंधूंच असतील अशी माहिती आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिकपर्यंत बॅनरबाजी सुद्धा झाली, ज्यामध्ये मराठी आणि ठाकरे असा उल्लेख करून मेळाव्याचं मराठी माणसांना निमंत्रण देण्यात आले. पण ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावरून शिंदे यांच्या शिवसेनेच्या निलम गोऱ्हेंनी ठाकरे ब्रँडवरून खोचक टीका केली. ब्रँड हा बाजारातल्या वस्तूंचा असतो असं गोऱ्हे म्हणाल्या.

मेळाव्यामध्ये कोणीही येऊ शकतं असं ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटलं. पण ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात महाविकास आघाडीचे बडे नेते येणार नाहीत. शरद पवार यांनी आपण जाणार नाही असं म्हटलं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण सुद्धा जाणार नाहीत. ठाकरे बंधूंच्या मेळाव्याचा विषय मराठी मुद्दाच आहे. पण ठाकरे बंधूंनीच मराठीचा ठेका घेतलेला नाही अशी टीका मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 05, 2025 08:06 AM