Jitendra Janawale Video : ‘…आता तसं होईल असं वाटत नाही’, पक्षाला रामराम ठोकताच ठाकरेंच्या भेटीनंतर शिवसैनिक ‘मातोश्री’पुढं नतमस्तक

Jitendra Janawale Video : ‘…आता तसं होईल असं वाटत नाही’, पक्षाला रामराम ठोकताच ठाकरेंच्या भेटीनंतर शिवसैनिक ‘मातोश्री’पुढं नतमस्तक

| Updated on: Feb 18, 2025 | 2:13 PM

उबाठा गटाचे नेते जितेंद्र जनावळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते शिंदेंच्या शिवसेनेचे धनुष्यबाण लवकरच हाती घेणार आहेत. जितेंद्र जनावळे हे उबाठा गटाचे विलेपार्ले येथील उपविभाग प्रमुख पदावर कार्यरत होते.

‘साहेब मला माफ करा’ असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या एका शिवसैनिकाने ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. उबाठा गटाचे नेते जितेंद्र जनावळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते शिंदेंच्या शिवसेनेचे धनुष्यबाण लवकरच हाती घेणार आहेत. जितेंद्र जनावळे यांनी काल आपल्या उपविभाग प्रमुख पदाचा राजीनामा दिला. जितेंद्र जनावळे हे उबाठा गटाचे विलेपार्ले येथील उपविभाग प्रमुख पदावर कार्यरत होते. येत्या २० फेब्रुवारी रोजी ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ‘उबाठा’ गटाचे आमदार तथा माजी मंत्री अनिल परब यांना कंटाळून यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. तर ‘साहेब मला माफ करा’ असे म्हणत जितेंद्र जनावळे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. तर त्याआधी त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या होत्या. दरम्यान, आज त्यांनी मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ठाकरेंच्या भेटीनंतर जितेंद्र जनावळे यांनी मातोश्रीसमोर वाकून डोकं ठेवून नमस्कार केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ते म्हणाले, ‘मातोश्री माझ्यासाठी मंदिर आहे. आपण मंदिराच्या उंबरठ्यावर झुकतो मी तेच केलं आहे. पण उद्धव ठाकरेंच्या भेटीत विभागाबद्दल काही निर्णय होईल असं मला वाटत नाही. मी त्यांना सांगितलं पण ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत’

Published on: Feb 18, 2025 02:12 PM