पाणीबाणी अन् आंदोलन, काय आहे अकोल्यातील ६९ गावांचा पाणीप्रश्न, बघा स्पेशल रिपोर्ट

पाणीबाणी अन् आंदोलन, काय आहे अकोल्यातील ६९ गावांचा पाणीप्रश्न, बघा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Apr 21, 2023 | 8:20 AM

VIDEO | ठाकरे गटाच्या आमदाराची देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घराबाहेर संघर्ष यात्रा, नेमका काय आहे प्रकार, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर पोहोचण्याआधीच ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आकोल्यातील खाऱ्या पाण्याच्या प्रश्नासाठी नितीन देशमुख यांनी नागपूर पर्यंत संघर्ष यात्रा काढली होती. पण नितीन देशमुख यांनी फडणवीस यांच्या घराबाहेरच का मोर्चा नेला, असा सवालही उपस्थित केला जात आहे. पाण्यासाठी निघालेली संघर्ष यात्रा देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर धडकण्यापूर्वीच नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या संघर्ष यात्रेला पोलिसांनी नकार दिला होता. त्यामुळे नितीन देशमुख हे गावाच्या वेशीवर आले आणि पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले. इतकेच नाही तर त्यांना अकोल्यातही सोडण्यात आले. खासपाण पट्टा प्रकरण काय आहे, अकोल्यातील ६९ गावांचा पाणी प्रश्न नेमकं काय आहे? आणि ठाकरे गटाचे आमदार हे आंदोलन का काढताय? हे जाणून घ्या या स्पेशल रिपोर्टमधून