अशोक चव्हाणांची 2 वर्षांपासून काँग्रेस सोडण्यासाठी धडपड… संजय राऊत यांच्या ‘त्या’ दाव्यानं खळबळ
अशोक चव्हाण हे दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. अशोक चव्हाण आताच नाही तर गेल्या काही काळापासून पक्ष सोडण्यासाठी धडपडताय. त्यांना आजचा मुहूर्त मिळाला असेल, असे म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय.
मुंबई, १३ फेब्रुवारी, २०२४ : अशोक चव्हाण हे दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वी ते एकनाथ शिंदे यांच्यासोबतच बाहेर पडण्याची, काँग्रेस सोडण्याची त्यांची योजना होती, असा मोठा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. तर अशोक चव्हाण आताच नाही तर गेल्या काही काळापासून पक्ष सोडण्यासाठी धडपडताय. त्यांना आजचा मुहूर्त मिळाला असेल, असे म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय. राऊत पुढे असेही म्हणाले की, नांदेडमध्ये सलग दोन लोकसभा निवडणुका अशोक चव्हाण हे हरले आहेत. त्यांच्या पत्नी आणि ते मोठे नेते असून त्यांचा पराभव झालाय. त्यामुळे नांदेड कुणाचा बालेकिल्ला नाही. तर नांदेडमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढेल आणि जिंकेलही असा दावाही राऊत यांनी केला.
Published on: Feb 13, 2024 05:34 PM
