Thackeray MNS Alliance : ठरलं? मुंबईत मनसे 70 जागांवर लढणार? BMC निवडणुकांसाठी ठाकरेंच्या सेनेचा प्रस्ताव काय?

Thackeray MNS Alliance : ठरलं? मुंबईत मनसे 70 जागांवर लढणार? BMC निवडणुकांसाठी ठाकरेंच्या सेनेचा प्रस्ताव काय?

| Updated on: Nov 21, 2025 | 10:32 AM

राजकीय वर्तुळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीची चर्चा सुरू आहे. सूत्रांनुसार, ठाकरे गटाकडून मनसेला ७० जागांचा प्रस्ताव दिला जात आहे. तर, मनसेने वरळी, शिवडी आणि दादर-माहीमसह महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये किमान तीन जागांची मागणी केल्याचे समजते.

राजकीय वर्तुळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांनुसार, ठाकरे गटाकडून मनसेला मुंबईतील ७० जागा देण्याचा प्रस्ताव दिला जात आहे. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी प्रत्येकी दोन जागा मनसेला देण्याचा हा प्रस्ताव असल्याचे समजते. ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या फॉर्म्युल्यावर प्राथमिक सहमती झाल्याचे बोलले जात आहे.

मात्र, मनसेने वरळी, शिवडी, दादर-माहीम यांसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये किमान तीन जागांची मागणी केली आहे. या युतीबाबत राज ठाकरे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. “ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेब घोषणा करतील, त्या दिवशीच सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेन,” असे मनसे नेत्यांनी स्पष्ट केले.

कल्याणमधून मनसेच्या काही माजी नगरसेवकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यात प्रकाश भोईर, सरोज भोईर, नंदा पाटील, कोमल पाटील, कस्तुरी देसाई यांचा समावेश असून, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजू पाटील आणि इतर माजी नगरसेवकांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.

Published on: Nov 21, 2025 10:32 AM