Mumbai BMC Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणा-कोणाला उमेदवारी?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीने वेग घेतला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने आत्तापर्यंत 102 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे, मातोश्रीवर हे वाटप दिवसभर सुरू राहणार आहे. दुसरीकडे, मुंबई पालिकेसाठी जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेची अंतिम बैठक आज पार पडणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 102 जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. मातोश्रीवर आज दिवसभर एबी फॉर्मचे वाटप सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षातील कार्यकर्त्यांनी “उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है” आणि “आदित्य साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत नेतृत्वाला पाठिंबा दर्शवला.
दरम्यान, मुंबई पालिकेसाठी भाजपने आपल्या मित्रपक्षासोबतची (शिवसेना – एकनाथ शिंदे गट) जागावाटपाची अंतिम बैठक आज निश्चित केली आहे. थोड्याच वेळात ही बैठक सुरू होण्याची शक्यता आहे. तिढा असलेल्या जागांवर शेवटचा हात फिरवला जाईल आणि त्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. जागावाटपाचा तिढा आजच सोडवला जाईल असेही म्हटले जात आहे. विशेष म्हणजे, यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म्सचे वाटप केले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.