Sharad Pawar | देशाने एक महानायक गमावला, शरद पवारांकडून दिलीप कुमारांना श्रद्धांजली

Sharad Pawar | देशाने एक महानायक गमावला, शरद पवारांकडून दिलीप कुमारांना श्रद्धांजली

| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 12:56 PM

जेजुरीत दिलीप कुमार यांचं शुटिंग सुरू होतं. आम्हाला त्याची कुणकुण लागली. मग आम्ही मित्रांनी सायकली काढल्या आणि सायकलवरून प्रवास करत जेजुरी गाठली. त्यावेळी मला पहिल्यांदा लांबून का होईना दिलीप कुमार यांना पाहता आलं, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगत होते.

जेजुरीत दिलीप कुमार यांचं शुटिंग सुरू होतं. आम्हाला त्याची कुणकुण लागली. मग आम्ही मित्रांनी सायकली काढल्या आणि सायकलवरून प्रवास करत जेजुरी गाठली. त्यावेळी मला पहिल्यांदा लांबून का होईना दिलीप कुमार यांना पाहता आलं, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगत होते. नंतर मी राजकारणात आलो. सरकारमध्ये विविध पदावर असताना दिलीप कुमार यांच्याशी माझा दोस्ताना झाला. ते लोकप्रिय आणि महान अभिनेते होतेच. पण माणूस म्हणूनही तितकेच ग्रेट होते, अशा शब्दात शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्याबाबतच्या आठवणी जागवल्या.