विलीनीकरणासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे, त्याला काही वेळ लागेल | Anil Parab

| Updated on: Nov 11, 2021 | 4:44 PM

एसटी कामगारांच्या संपावरून परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. आज एसटी कामगारांच्या पाठी उभे राहणाऱ्यांनी त्यांचं सरकार असताना एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण का केलं नाही? असा सवाल अनिल परब यांनी केला आहे.

Follow us on

एसटी कामगारांच्या संपावरून परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. आज एसटी कामगारांच्या पाठी उभे राहणाऱ्यांनी त्यांचं सरकार असताना एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण का केलं नाही? असा सवाल अनिल परब यांनी केला आहे. तसेच एसटी कामगारांना पुन्हा एकदा संप मागे घेण्याचं आवाहनही परब यांनी केलं आहे. अनिल परब यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. आम्हाला काही एसटी बंद ठेवण्यात किंवा खाजगी बसेसना स्टँडवर आणण्यात रस नाही. एसटी कामगार राजकारणाचे बळी ठरत आहेत. आज त्यांची भाषा पाहिली तर संप चिघळवण्याचे काम ते करत आहेत, असं सांगतानाच त्यांच्या काळात एसटीचं विलनीकरण का केलं नाही? असा सवाल परब यांनी केला. त्यावेळी राज्याची आणि एसटीची आर्थिक परिस्थिती चांगली होती. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. एसटी व्यवस्थित धावत होती. आज जे मागणीसाठी जोरजोरात बोलत होते त्यांचं तर सरकार तेव्हा होतं. केंद्रातही त्यांचंच सरकार होतं. तेव्हा त्यांनी एसटीचं विलनीकरण का केलं नाही? असा सवाल त्यांनी केला. तसेच आज थातूरमातूर उत्तर देणाऱ्यांनी पूर्ण व्हिडीओ दाखवावाच, असं आव्हानच त्यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना दिलं.