कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वारसांना मदतनिधी देण्याचे काम युद्धपातळीवर : जिल्हाधिकारी

| Updated on: Dec 28, 2021 | 12:48 PM

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना आणि कोरोनात ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या वारसांना मदत निधी देण्याचे काम औरंगाबाद जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे, आतापर्यंत अनाथ झालेल्या तब्बल 27 मुलांना प्रत्येकी 15 लाख रुपयांचे मदत निधी देण्याचे प्रस्ताव औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केंद्राकडे पाठवले आहेत,

Follow us on

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना आणि कोरोनात ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या वारसांना मदत निधी देण्याचे काम औरंगाबाद जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे.आतापर्यंत अनाथ झालेल्या तब्बल 27 मुलांना प्रत्येकी 15 लाख रुपयांचे मदत निधी देण्याचे प्रस्ताव औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केंद्राकडे पाठवले आहेत. तर कोरोना मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये मदत देण्याचे तब्बल 1057 प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्राकडे पाठवले आहेत या सगळ्या व्यक्तींना त्यांच्या बँक आणि पोस्ट खात्यामध्ये मदत देण्यास केंद्राकडून सुरुवात झालेली आहे, ही मदत मिळत असल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांना आणि कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.