“..तर मी आंधळा झालो असतो,” सोमय्यावरील हल्ल्याची थेट केंद्रीय गृहसचिव चौकशी करणार?

“..तर मी आंधळा झालो असतो,” सोमय्यावरील हल्ल्याची थेट केंद्रीय गृहसचिव चौकशी करणार?

| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 1:25 PM

भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोमय्या यांनी आघाडी सरकारवर (maha vikas aghadi) जोरदार हल्ला चढवला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोमय्या यांनी आघाडी सरकारवर (maha vikas aghadi) जोरदार हल्ला चढवला आहे. “काल सतत मुख्यमंत्री कार्यालयातून खार पोलिसांना फोन जात होते. ही एफआयआर आहे. त्यात यात लिहिलंय. शिवसैनिक 100 मीटर आणि 3 किलोमीटर दूर आहेत. हे पांडेंनी डिक्टेट केलं. माझ्या गाडीवर लांबून दगड आला हे माझ्या नावाने पांडेंनी लिहिलं. मॅनिप्युलेटेड एफआयआर आहे त्यामुळे मी त्यावर सही करणार नाही असं सांगितलं. ही फेक एफआयआर आहे, असंही मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी ही एफआयआर ऑनलाईन पाठवली, असा दावा करतानाच मी चार इंचावर होतो. दगड लागला असता तर माझा डोळा गेला असता,” असं ते म्हणाले.

Published on: Apr 24, 2022 01:25 PM