संजय राऊत मूर्ख? मुख्यमंत्री शिंदेंना दिलेल्या ‘त्या’ गंभीर इशाऱ्यावर कुणाचा पलटवार?
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे गुंडांसोबतचे फोटो ट्वीट करण्याच्या मालिकेत खंड पडलाय. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. दरम्यान, संजय राऊत हे मुर्खांसारखं वक्तव्य करतात असे म्हणत शिंदेंचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय.
मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ : संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे गुंडांसोबतचे फोटो ट्वीट करण्याच्या मालिकेत खंड पडलाय. मात्र एकनाथ शिंदे यांचे आणखी गुंडांसोबतचे फोटो आहेत. ते फोटो पाहून केंद्रीय मंत्री अमित शाह देखील विचार करतील, असा गंभीर इशारा संजय राऊत यांनी दिलाय. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. दरम्यान, संजय राऊत हे मुर्खांसारखं वक्तव्य करतात असे म्हणत शिंदेंचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय. ५ फेब्रुवारीला खासदार श्रीकांत शिंदेंसोबत गुंड हेमंत दाभेकरचा फोटा ट्वीट केला. नंतर ६ फेब्रुवारीला निलेश घायवळचा शिंदेंसोबतचा फोटो ट्वीट केला. ७ फेब्रुवारीला जितेंद्र जंगनचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेशाचा जुना फोटो राऊतांनी ट्वीट केला. ८ फेब्रुवारीला गुंड सपकेचा फोटो ट्वीट करत सवाल केला. त्याच दिवशी गुंड मॉरिसचा शिंदेंसोबतचा फोटोही त्यांनी ट्वीट केला. १० फेब्रुवारीला गुंड व्येंकट मोरेचा शिंदेंसोबत सेल्फी घेतानाचा फोटो ट्वीट केला. तर ११ फेब्रुवारीला लालसिंग राजपुरोहित यांना गुंड म्हणत राऊतांनी फोटो ट्वीट केला आणि निशाणा साधला. यानंतर राऊतांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे म्हणत लालसिंग राजपुरोहित यांनी प्रत्युत्तर दिलंय. यानंतर राऊत यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना गंभीर इशारा दिलाय.
