Ajit Pawar Video : ‘सुरेश धस नेता नाही तर खालचा…’, मुंडेंच्या राजीनाम्यावरुन दादा गट अन् भाजपात वाजणार?

Ajit Pawar Video : ‘सुरेश धस नेता नाही तर खालचा…’, मुंडेंच्या राजीनाम्यावरुन दादा गट अन् भाजपात वाजणार?

| Updated on: Jan 29, 2025 | 11:22 AM

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणी विरोधकच नाहीतर सत्ताधारी आमदार केल्या काही दिवसांपासून करताना दिसताय. मात्र आपला राजीनामा कोणी मागितलाच नाही, असा दावा धनंजय मुंडे यांनी केलाय.

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आता हळू हळू अजित पवार आणि भाजपमध्ये भांड्याला भांडं लागतंय की काय अशी चिन्ह दिसताय. राजीनाम्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली. त्यावर खालच्या कार्यकर्त्यावर बोलत नसल्याचं उत्तर अजित पवारांनी दिलंय. राजीनामा घेण्याच्या चर्चांदरम्यान, धनंजय मुंडे मंत्रालयात काल पाहायला मिळाले. यावेळी ते कॅज्युल पेहरावात असून त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही असा विश्वास त्यांना देण्यात आल्याचा त्यांच्या चेहऱ्यावर सांगत होता. दरम्यान, अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, मुंडेंच्या गैर व्यवहाराचे सर्व पुरावे दिलेत. त्यावर ती कागदपत्र घेऊन अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना भेटतील असं आश्वासन दादांनी दिल्याचे दमानिया म्हणाले. तर दादांऐवजी फडणवीसांना धनंजय मुंडेच भेटल्याचे पाहायला मिळाले. या भेटीनंतर माझ्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उत्तर देतील असं स्पष्टपणे धनंजय मुंडे म्हणाले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jan 29, 2025 11:22 AM