Malegaon मध्ये हिजाबसाठी हजारो मुस्लिम महिला एकवटल्या-TV9
मालेगावात हिजाबसाठी हजारो मुस्लिम महिला एकवटल्याचे पहायला मिळाले. पोलिसांचा विरोध झुगारून कल्लू स्टेडियम वर हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती दिसून आली. कर्नाटकातील आंदोलन घोषणा देणाऱ्या त्या तरूणीचा उल्लेखही यावेळी करण्यात आला.
मालेगाव : सुरूवातील कर्नाटकात सुरू झालेल्या हिजाबचा वाद सध्या महाराष्ट्रभर पसरला आहे. महाराष्ट्रातील मुस्लिम महिलाही हिजाबवरून चांगल्याचा आक्रमक झाल्या आहेत. आज पुण्यात आणि मालेगावातही पोलिसांचा विरोध झुगारून आंदोलनं आणि मेळावे भरवण्यात आले. कर्नाटकाल्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर सुरूवातील धुमाकूळ घातला. एका बाजून जय श्री राम तर दुसऱ्या बाजूने अल्ला…या वादाने राजकारणही ढवळून निघाले आहे. देशभरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणी याला दडपशाहीचं नाव देतंय तर कोणी धर्माचं. मालेगावात हिजाबसाठी हजारो मुस्लिम महिला एकवटल्याचे पहायला मिळाले. पोलिसांचा विरोध झुगारून कल्लू स्टेडियम वर हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती दिसून आली. कर्नाटकातील आंदोलन घोषणा देणाऱ्या त्या तरूणीचा उल्लेखही यावेळी करण्यात आला.
