Pratap Sarnaik : शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री, जय गुजरातच्या घोषणा अन्.. बघा VIDEO घडलं काय?
शांततेत सुरू असलेल्या मनसेच्या मोर्चात प्रताप सरनाईक दाखल होताच काहीसा गोंधळ झाला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी केली आणि मोर्चातील आंदोलक आक्रमक झाले आणि मोर्चा चिघळला.
आज मराठी भाषेसाठी मुंबईतील मीरा भाईंदर येथे मनसेच्या वतीने एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मोर्चाच्या आधीच मनसेला मोठा धक्का मिळाल्याचे पाहायला मिळाले. मोर्चासाठी मिरा-भाईंदरमध्ये येण्यास मनसेला पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला होता. असं असलं तरी मनसे आजच्या मोर्चावर ठाम होतं. दरम्यान, पोलिसांकडून या मोर्चाची परवानगी नाकारण्यात आली होती. तर दुसरीकडे मोर्चाचे आयोजन करणारे मनसे नेते अविनाश जाधव यांना मध्यरात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतलं. यानंतर मराठी माणूस आणि मनसेसैनिकांमध्ये एकच संताप पाहिला मिळाला. दरम्यान, शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संपूर्ण प्रकरणात मोर्चाला आपला पाठिंबा दर्शवत मोर्चात सहभाग घेतला. मात्र यावेळी आंदोलकांनी ‘सरनाईक गो बॅक’ जय गुजरात अशा घोषणा दिल्या. इतकंच नाहीतर एका आंदोलकांने प्रताप सरनाईक यांच्या अंगावर बाटलीही भिरकावल्याचे पाहायला मिळाले. हेच दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
