‘मुंबईला श्वास घेऊन द्या’, आरे वाचवण्यासाठी आपचं आंदोलन

| Updated on: Jul 24, 2022 | 2:36 PM

"गेल्या अडीच वर्षांपासून इथे आरे कारशेडवर स्थगिती होती. ती स्थगिती काढण्यात आली. आरे जंगल वाचवण्यासाठी आम आदमी पार्टी आधीपासून आघाडीवर आहे"

Follow us on

मुंबई: “गेल्या अडीच वर्षांपासून इथे आरे कारशेडवर स्थगिती होती. ती स्थगिती काढण्यात आली. आरे जंगल वाचवण्यासाठी आम आदमी पार्टी आधीपासून आघाडीवर आहे. या चुकीच्या निर्णयाला, मुंबईकरांच्या हिताच्या नसलेल्या निर्णयाला आम्ही विरोध करतोय” असं आपच्या पदाधिकाऱ्याने सांगितलं. “आम्हाला मेट्रो पाहिजे आणि आरे जंगल वाचवायचं आहे. मेट्रो 2 आणि मेट्रो 7 ही लाइन जोडली गेली तिथे काही अडचण नाही. मेट्रो 3 आणि मेट्रो 6 च कारशेड कांजूरमध्ये येत, ते सुद्धा जोडू शकतात. आम्हाला मुंबईची फुफ्फुस वाचवायची आहेत. मुंबईला श्वास घेऊन द्या म्हणून आम्ही आंदोलन करतोय. यापुढे आक्रमक आंदोलन करावं लागलं तर ते ही करु” असं आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्याने सांगितंल.