निवडणूक आयोगाचा काय असेल निर्णय? कोण काय म्हणालं? पहा टॉप 9 न्यू
बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करून कवचकुंडलं काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा टोला किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
राज्यात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेच्या धनुष्यबान या चिन्हावरून सध्या रस्सी खेच पहायला मिळत आहे. तर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांनी आपआपली कागदपत्रं निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. त्याअनुषंगाने सोमवारी यावर निवडणूक आयोगाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे. यादरम्यान आज दिल्लीत निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेच्या धनुष्यबान या चिन्हाबाबत निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ज्या गटाचा दावा योग्य असेल त्यालाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल असे ते म्हणाले. तर बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करून कवचकुंडलं काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा टोला किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाला लगावला आहे. तर ग्रामपंचायती पासून आमदार खासदार हे आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळेल असे वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलं आहे.
