Accident | महाराष्ट्र हादरलं! रविवारची रात्र ठरली काळरात्र; 3 अपघातांत 17 जणांचा दुर्दैवी अंत

Accident | महाराष्ट्र हादरलं! रविवारची रात्र ठरली काळरात्र; 3 अपघातांत 17 जणांचा दुर्दैवी अंत

| Updated on: May 25, 2026 | 10:50 AM

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भीषण अपघातांची मालिका सुरूच असून रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत राज्यात तीन मोठे अपघात घडले. सातारा, धुळे आणि जुन्नर येथे झालेल्या या दुर्घटनांमध्ये तब्बल 17 जणांचा मृत्यू झाला असून 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. या सलग अपघातांमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात एक स्कॉर्पिओ तब्बल 800 फूट खोल दरीत कोसळल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतेक तरुणांचा समावेश असून सर्वजण कोरेगाव तालुक्यातील आसगाव गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेनंतर महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, पोलीस आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात आलं.
दरम्यान, धुळेजवळील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग घाटात रेतीचा डंपर आणि ट्रॅव्हल्स वाहनांमध्ये भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
तर अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर जुन्नर परिसरात एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या सलग अपघातांमुळे राज्यात शोककळा पसरली असून प्रशासनाने घाट रस्ते आणि महामार्गांवर वाहन चालवताना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

Published on: May 25, 2026 10:50 AM
Follow Us