Omar Abdullah : तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी

Omar Abdullah : तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी

| Updated on: May 16, 2025 | 4:21 PM

Tulbul Project Dispute : तुलबुल प्रकल्पाचा व्हिडिओ ओमर अब्दुल्ला यांच्याकडून ट्विट करण्यात आलेला असून हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

तुलबुल प्रकल्पाचा व्हिडिओ ओमर अब्दुल्ला यांच्याकडून ट्विट करण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीरमधील हा तुलबुल प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. पाकिस्तानने या तुलबुल प्रकल्पाचं काम थांबवलेलं होतं. तर भारत – पाकिस्तान तणाव कायम असताना या प्रकल्पाविषयी बोलणं चुकीचं आहे असं मुफ्ती यांनी म्हंटलं आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी देखील ट्विट करून ओमर अब्दुल्ला यांच्यावर निशाणा साधलेला आहे.

तुलबुल नेव्हीगेशन बॅरेजचं काम 1980 च्या दशकात सुरू झालेलं होतं. परंतु सिंधु पाणी कराराचा हवाला देत पाकिस्तानच्या दबावामुळे ते सोडून द्यावं लागलं होतं. आता सिंधु जल करार स्थगित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण हा प्रकल्प पुन्हा सुरू करू शकतो का? असा प्रश्न मला पडतो. अशा आशयाच ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केलेलं आहे.

Published on: May 16, 2025 04:19 PM